'घरोघरी मातीच्या चुली 'मालिकेतील 'हा' अभिनेता आहे प्रसिद्ध संगीतकाराचा मुलगा; तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 17:25 IST2025-09-14T17:17:37+5:302025-09-14T17:25:03+5:30

प्रसिद्ध संगीतकाराचा मुलगा आहे 'हा' अभिनेता; स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत करतोय काम, ओळखलं का?

'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका छोट्या पद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

अभिनेता सुमीत पुसावले आणि रेश्मा शिंदेची मुख्य भूमिका असलेली ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असते.

रेश्मा, सुमीतसह मालिकेत सविता प्रभूणे, प्रतीक्षा मुणगेकर तसेच आशुतोष पत्की, ऋतुजा कुलकर्णी, आरोही सांभरे यांसारख्या कलाकारांची तगडी स्टारकास्ट आहे.

दरम्यान, या मालिकेत जानकीचा दीर म्हणजेच सौमित्रची भूमिका अभिनेता अभिषेक पत्कीने साकारलेली आहे.

परंतु, तुम्हाला माहितीये का? आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे.

अशोक पत्की हे मराठी संगीत क्षेत्रातलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. ११५ मराठी चित्रपट, २५0 च्यावर नाटके, आणि ५ हजारांवर जिंगल्स त्यांच्या नावावर आहेत. भावगीतं, नाटक, चित्रपट, जाहिराती, जिंगल, शीर्षकगीतं निर्माण करणारे ते अत्यंत यशस्वी संगीतकार आहेत.

त्यांनी संगीत दिलेली अनेक मालिकांची शीर्षक गीतं तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत. वादळवाट, गोट्या, आभाळमाया, अस्मिता, यांसारख्या अनेक मालिकांची शीर्षक गीतं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्याचबरोबर 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेच्या शीर्षक गीताला देखील अशोक पत्की यांनीच संगीत दिले होते.