नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही! अमृताने शेअर केले लग्नसोहळ्यातील खास Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 19:09 IST2023-11-20T19:01:04+5:302023-11-20T19:09:05+5:30
अमृताने मराठी गाण्यांच्या ओळी लिहित शेअर केले लग्नातील खास क्षण

बिग बॉस मराठी फेम कपल अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. कुटुंबिय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत निसर्गरम्य ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडला.
प्रसाद आणि अमृताने लग्नासाठी खास पांरपरिक लूक केला होता. गुलाबी रंगाच्या साडीत अमृताचं सौंदर्य खुलून आलं होतं. तर धोतर, सदरा आणि टोपी असा मराठमोळा लूक प्रसादने केला होता.
अमृता-प्रसादच्या लग्नाला कलाविश्वातील कलाकारांनी हजेरी लावली होती. तर चाहत्यांनी प्रसाद आणि अमृताला शुभेच्छा दिल्या आहेत.
नुकतंच अमृताने लग्नातील आणखी काही फोटो शेअर केले आहेत. हे नवविवाहित जोडपं खूपच खास दिसत आहे. तसंच अमृताने फोटोंना छान कॅप्शन दिलं आहे.
नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही..या गाण्यांच्या ओळी तिने कॅप्शनमध्ये दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवरही चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रसाद आणि अमृताची पहिली भेट झाली होती. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात ते दोघेही सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरातच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते.
घरातून बाहेर पडताच त्यांनी प्रेमाची कबुली देत गुपचूप साखरपुडाही उरकला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.