पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में...! मराठमोळ्या अभिनेत्रीचं हटके फोटोशूट, नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:16 IST2025-02-21T17:05:31+5:302025-02-21T17:16:32+5:30

अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने मराठी कलाविश्वात जोरावर हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

'बालक-पालक', 'आनंदी गोपाळ' यांसारख्या चित्रपटातून अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद घराघरात पोहोचली.

'आनंदी गोपाळ' चित्रपटात तिने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं.

नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे शेअर केलेले फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत.

काळ्या रंगाची पोल्का डॉट साडी नेसून अभिनेत्रीने हटके अंदाजात हे फोटो क्लिक केले आहेत.

भाग्यश्रीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.

"Clearing the drafts, Showing off my skills..." असं कॅप्शन तिने या खास फोटोंनी दिल्याचं पाहायला मिळतंय.