'कॉम्प्युटर सायन्स'चं शिक्षण अन् अभिनयाकडे वळली; महाडची मुलगी गाजवतेय टीव्ही इंडस्ट्री, खलनायिका साकारून भल्याभल्यांना फोडला घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 18:30 IST2026-02-24T18:12:35+5:302026-02-24T18:30:12+5:30

कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण अन् अभिनयाकडे वळली, महाडची 'ही' मुलगी गाजवतेय मालिकाविश्व, ओळखलं?

अभिनयाच्या चंदेरी दुनियेत एखाद्याचा निभाव लागणं कठीण आहे. त्यासाठी स्ट्रगल कोणाला चुकलेला नाही. ही एक अशी जागा आहे, जिथे कधी एखाद्या व्यक्तीला एका रात्रीत घवघवीत यश मिळतं, तर कधी एखाद्या कलाकाराला मोठ्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते.

मनोरंजनविश्वातील संघर्षाचा काळ पाहून काहीजण हार मानून माघारी फिरतात, तर काही कलाकार असे आहेत जे या यशाची वर्षानुवर्षे वाट पाहतात आणि मराठीतील अशाच एका गुणी अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

या अभिनेत्रीचं नाव विदिशा म्हसकर आहे. 'बन मस्का', 'हे मन बावरे', 'ती फुलराणी', 'चांदणे शिंपित जाशी', 'रंग माझा वेगळा',' ३६ गुणी जोडी',' पिंगा गं पोरी पिंगा' यांसारख्या मालिकांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेषत: विदिशा खलनायिकेच्या भूमिकांसाठी आजही ओळखली जाते.'रंग माझा वेगळा' मालिकेतील तिचं आएशा नावाचं पात्र खूप गाजलं होतं.

नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या इंडस्ट्रीतील प्रवासाविषयी भाष्य केलं. विदिशा ही मुळची महाडची आहे. तिचं बालपण कोकणातच गेलं.

शिवाय तिने रत्नागिरीत कॉम्यूटर सायन्सचं शिक्षण पूर्ण केलं. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही तिने इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये असताना एकांकिक पाहून तिला अभिनयात रुची निर्माण झाली होती.त्याच दरम्यान,विदिशाला स्टेजवर नाटकात काम करण्याची संधी मिळाली.

कॉम्यूटर सायन्सचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मास्टर्ससाठी रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर एकांकिकामध्ये सहभाग घेतला. तिथे प्रवेश घेतल्यानंतर नाट्यवलयमध्ये ती सामील झाली.

या मुलाखतीत ती म्हणाली,"या सगळ्यात विदिशाच्या आई-वडिलाचां पूर्ण पाठिंबा होता. परंतु, शिक्षणही पूर्ण करण्यावर त्यांचा भर होता. त्याचं या क्षेत्रात काम करू नकोस असं म्हणणं नव्हतंच पण खूप सपोर्टही नव्हता. तू तुझं कमवं आणि जे करायचं ते कर... असं त्यांचं म्हणणं होतं. बऱ्याचदा ते माझं नाटक पाहायला देखील आले होते. "

'बन मस्का' हा विदिशाचा पहिला प्रोजेक्ट होता. त्यानंतर तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला.