तेरी ये अदाएँ! प्रिंटेड ब्लॅक साडीत स्वानंदीने केलं फोटोशूट, सिंपल लूकची होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 01:35 PM2024-04-01T13:35:27+5:302024-04-01T13:42:00+5:30

Swanandi tikekar: स्वानंदी या लूकमध्ये प्रचंड साधी आणि सिंपल दिसत असून तिच्या याच साधेपणाने तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर.

स्वानंदी कलाविश्वासह सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

अलिकडेच स्वानंदीने प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

स्वानंदीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. त्यातील निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

स्वानंदीने काळ्या रंगाच्या प्रिंटेड साडीत खास फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

स्वानंदीने काही मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. यात दिल दोस्ती दुनियादारी, अगं अगं सुनबाई या मालिकांमध्ये काम केलं आहे.

स्वानंदीने आभाळमाया या मालिकेत बालकलाकाराचीही भूमिका साकारली आहे.

स्वानंदीने काही रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालनही केलं आहे.

स्वानंदी, अभिनेता उदय टिकेकर आणि आरती अंकलीकर यांची एकुलती एक लेक आहे.