'नवरी मिळे हिटलरला'फेम अभिनेत्रीचा बोल्ड लूक, कोण आहे ही सुंदरी ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 14:48 IST2025-07-14T14:39:53+5:302025-07-14T14:48:12+5:30
अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय ती संगीत घराण्यातून आली आहे. तिचे वडील प्रसिद्ध बासरीवादक आहेत.

मराठी टेलिव्हिजनवरील अनेक अभिनेत्रींची सोशल मीडियावर क्रेझ असते. विविध मराठी मालिकांमधील अभिनेत्रींचा मोठा चाहतावर्ग असतो. अशीच एक अभिनेत्री जिचा बोल्ड अवतार पाहून चाहते घायाळ झालेत.
'नवरी मिळे हिटलरला' या गाजलेल्या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत दिसलेल्या एका अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मालिकेत लीलाची सून लक्ष्मीच्या भूमिकेत दिसलेली ही अभिनेत्री आहे सानिका काशिकर (Sanika Kashikar). सानिकाने याआधीही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
निळ्या रंगाच्या स्टायलिश वनपीसमध्ये सानिका सुंदर दिसत आहे. ऑफ शोल्डर, बोल्ड बॅक लूक असलेला असा तिचा आऊटफिट आहे.
सानिकाने या आऊटफिटवर एकापेक्षा एक पोज देत फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिने आपली टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे
तसंच ती सुट्टीसाठी जिथे गेली आहे ते राहत असलेलं ठिकाणंही खूप सुंदर दिसत आहे. मालिका संपल्यानंतर सानिका सध्या निवांत क्षण अनुभवत आहे.
सानिकाने 'मन झालं बाजिंद' मालिकेतील अंतराच्या भूमिकेतूनही लक्ष वेधून घेतलं होतं. तसंच ती 'काव्यांजली','पाहिले न मी तुला','आनंदी हे जग सारे','वैजू नं १' या मालिकांमध्येही दिसली आहे.
अभिनयात येण्यापूर्वी इंटेरियर डिझाइनिंगचं शिक्षण घेतलं आहे. नोकरीही केली होती. तसंच सानिका गायिकाही आहे. तिचे वडील ‘पंडित आनंद काशीकर’ हे उत्कृष्ट बासरीवादक म्हणूनओळखले जातात. तर तिचा भाऊ अद्वैत काशीकर हा देखील बासरीवादक आहे.