भरजरी लेहेंगा अन् पाहुण्यांचा थाट! मराठी अभिनेत्रीच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:50 IST2025-01-02T15:42:00+5:302025-01-02T15:50:16+5:30
रेश्मा शिंदे, निखिल राजेशिर्के यांच्यापाठोपाठ अभिनेत्री ऋतुजा लिमयेदेखील लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

२०२४ मध्ये अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. वर्षा अखेरीस रेश्मा शिंदे, निखिल राजेशिर्के यांच्यापाठोपाठ अभिनेत्री ऋतुजा लिमयेदेखील लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
ऋतुजाने २३ डिसेंबरला बॉयफ्रेंड हृषिकेश पाटीलसोबत लग्नगाठ बांधली आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आयुष्यातील या खास क्षणासाठी ऋतुजाने लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. तर हृषिकेशने शेरवानी घातली होती.
कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत ऋतुजा आणि हृषिकेश यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
ऋतुजा आणि हृषिकेश गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आता लग्नाच्या बेडीत अडकत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
नोव्हेंबर महिन्यात ऋतुजाने गुपचूप साखरपुडा केला होता. त्यानंतर आता तिने हृषिकेशसोबत सात फेरे घेतले आहेत.
ऋतुजाने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. सही रे सही या नाटकातही ती झळकली होती.
याशिवाय अनेक मालिकांमध्ये ती छोटेखानी भूमिका साकारताना दिसली.
'नवे लक्ष्य, 'अस्मिता', 'चूक भूल द्यावी घ्यावी', 'खुलता कळी खुलेना', 'तू माझा सांगाती', 'दिल दोस्ती दोबारा', 'अंजली', 'जिंदगी नॉट आऊट', 'जय देवा श्री गणेशा' या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.