वेलकम टू गोवा सिंघम! मराठी अभिनेत्रीची पहिलीच domestic फ्लाईट; ग्लॅमरस लूकमध्ये दिसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:36 IST2026-01-30T13:26:25+5:302026-01-30T13:36:23+5:30
अभिनेत्रीच्या कॅप्शनने वेधलं लक्ष, पहिल्यांदाच गोव्यात गेली अभिनेत्री?

गोवा हे फिरण्यासाठीचं अनेकांचं आवडतं ठिकाण. सेलिब्रिटीही गोव्यात जाऊन धमाल करतात. एक मराठी अभिनेत्री नुकतीच पहिल्यांदाच गोव्यात पोहोचली आहे.

अभिनेत्रीने गोव्यातील विविध ठिकाणांहून फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे ती गोव्याला पहिल्यांदाच गेलीये असं दिसतंय.

ही अभिनेत्री आहे रुचिरा जाधव. ती गोव्याला कामासाठी आणि फिरायलाही गेली होती असं तिने म्हटलं आहे. तसंच ही तिच्या फॅशनवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

रुचिरा कायम ग्सॅमरस लूकमध्ये दिसते. तिच्या व्हेकेशन फोटोंची चर्चा असते. निऑन ग्रीन रंगाच्या स्कीन टाईट शॉर्ट वनपीसमध्ये ती कमालीची हॉट दिसत आहे.

डोक्यावर हॅट, पायात स्लीपर आणि गोव्यातलं ऊन अशा वातावरणात तिने फोटोशूट केलंय. मागे समुद्र आणि पुढे रुचिरा स्टाईलमध्ये पोज देत आहे.

तसंच तिने गोव्यातील प्रसिद्ध मंगेशी मंदिरालाही भेट दिली. गुलाही कुर्ता, ब्लू जीन्स, कानात झुमके असा तिचा साधा लूक दिसत आहे ज्यातही ती सुंदर दिसत आहे.

रुचिराने गोव्यात शॉपिंग आणि तिथलं फूडही एन्जॉय केलं. याचीही झलक तिने फोटोंमधून दाखवली आहे.

'वेलकम टू गोवा सिंघम', लोक नेहमी त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्रीपचे फोटो शेअर करतात. पण मी ९-१० आंतरराष्ट्रीय ट्रीपनंतर माझ्या पहिल्या डोमॅस्टिक ट्रीपचे फोटो शेअर करत आहे. आणि ही ट्रीप गोव्याची आहे. गोव्याची बातच काही और आहे.", असं कॅप्शन तिने लिहिलं आहे.

















