प्रार्थनाच्या गर्ल गँगला पाहिलंत का? उन्हाळ्याची सुट्टी करतायेत एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 01:28 PM2024-04-13T13:28:58+5:302024-04-13T13:33:52+5:30

Prarthana behere: सध्या प्रार्थना तिच्या गर्ल गँगसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

मराठीसह हिंदी मालिका विश्वातही प्रार्थनाने तिच्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

पवित्र रिश्ता या मालिकेत प्रार्थनाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

प्रार्थनाने मालिकांसह सिनेमातही काम केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या प्रार्थना तिच्या गर्ल गँगसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

प्रार्थनाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती तिच्या फॅमिली आणि मैत्रिणींसोबत सुट्टी एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे.