नाकात नथ अन् नऊवारी साडी; प्रार्थना बेहरेचा मराठमोळा ठसका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 17:57 IST2022-03-27T17:48:58+5:302022-03-27T17:57:17+5:30
Prarthana behere:अलिकडेच तिने पारंपरिक नऊवारी साडीत तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रार्थनाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
सध्या प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रार्थनाचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे.
अलिकडेच तिने पारंपरिक नऊवारी साडीत तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये प्रार्थना कमालीची सुंदर दिसत आहे.
नाकात नथ, नऊवारी साडी आणि त्यावर साजेसा हलकासा मेकअप असा लूक प्रार्थनाने केला आहे.
प्रार्थना मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसंच तिने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.