'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? लाल साडीत समुद्रकिनारी केलं सुंदर फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:55 IST2025-06-06T16:36:34+5:302025-06-06T16:55:18+5:30
लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री सध्या मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

मराठी टेलिव्हिजनविश्वातील अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्यामुळे आणि अभिनय कौशल्यामुळे लक्ष वेधून घेत आहेत. इंडस्ट्रीत अनेक नवे कलाकार अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत.
अशीच एक मराठी अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत आहे.
नुकतंच अभिनेत्रीने समुद्रकिनारी हे सुंदर फोटोशूट केलं आहे. लाल रंगाच्या साडीत ती समुद्रकिनारी फिरत आहे. यादरम्यान काढलेले फोटो काळजाचा ठोका चुकवणारे आहेत.
तिच्या प्रत्येक अदाकारीवर आणि पोजवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. तसंच तिचं सौंदर्य वेड लावणारं आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
ही अभिनेत्री आहे रसिका वाखारकर (Rasika Wakharkar). लाल रंगाची बांधणी साडी, व्ही नेक ब्लाऊज, मोकळे केस आणि कातिल नजर अशा लूकमध्ये तिचं हे फोटोशूट आहे.
रसिका सध्या 'अशोक मा.मा.' मालिकेत भैरवीचं पात्र साकारत आहे. या भूमिकेतून तिला बरीच लोकप्रियता मिळाली आहे.
रसिकाने याआधी 'पिरतीचा वनवा उरी पेटला' मालिकेत 'सावी' ही भूमिका साकारली होती. ती तिची पहिलीच मालिका होती. याशिवाय रसिकाने 'अथांग' या मराठी वेबसीरिजमध्येही काम केलं होतं.
रसिकाने 'मेकअप' आणि 'साईड मिरर' या मराठी सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.