PHOTO: मराठमोळ्या अभिनेत्रीचा हिमाचल प्रदेशमध्ये सफरनामा; कुटुंबीयांसोबत स्पेंड करतेय क्वालिटी टाईम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:01 IST2025-03-20T13:52:39+5:302025-03-20T14:01:17+5:30
अभिनेत्री सायली देवधरचा हिमाचल प्रदेशमध्ये सफरनामा; कुटुंबीयांसोबत करतेय भटकंती.

'लग्नाची बेडी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली देवधर. या मालिकेत तिने साकारलेली सिंधू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांची लाडकी सिंधू त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
अभिनेत्री सायली देवधर सध्या हिमाचल प्रदेशच्या निसर्गात मनसोक्त फिरण्याचा आनंद लूटतेय.
शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढत ती हिमाचल प्रदेशमध्ये फिरण्यासाठी गेली आहे.
अभिनेत्री आपल्या कुटंबीयांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे.
नुकतेच सायली देवधरने हिमाचल प्रदेश येथे सफर करतानाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.