मराठी अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, गर्लफ्रेंडचे फोटो पाहून नारकरांच्या लेकाची कमेंट; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:54 IST2026-02-03T11:38:30+5:302026-02-03T11:54:49+5:30

अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा अमेय गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्रीला डेट करतोय.

मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर चर्चेत असतात. फिटनेसमुळेही त्यांचं कौतुकही होतं.

त्यांचा लेक अमेय नारकर मधल्या काळात चर्चेत आला होता. एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला तो डेट करतोय असं समोर आलं होतं.

ही अभिनेत्री आहे ईशा संजय. ईशा नुकतीच झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत दिसली होती. काही दिवसांपूर्वीच ही मालिका संपली.

ईशा संजयने सोशल मीडियावर हे हॉट फोटो पोस्ट केले आहेत. डीप नेक चेक्स वनपीसमध्ये ती एकदम बोल्ड अँड ब्युटीफूल दिसत आहे.

मोकळे केस, ग्लोई मेकअपमध्ये ती आणखी सुंदर दिसत आहे. सोफ्यावर बसून तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.

'मला खात्री आहे की हेच प्रेम आहे', असं कॅप्शन तिने या फोटोशूटला दिलं आहे.

ईशाच्या या हॉट फोटोशूटवर बॉयफ्रेंड अमेयचीही कमेंट आली आहे. 'डेड...' असं म्हणत त्याने गर्लफ्रेंडच्या लूकचं कौतुक केलं आहे.