मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्यासोबत बांधली साताजन्माची गाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 10:27 IST2026-03-08T10:22:49+5:302026-03-08T10:27:42+5:30
मराठी अभिनेत्रीची आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात...

मराठी मनोरंजनविश्वात लग्नसराई सुरु आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. आता लोकप्रिय मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे (Apurva Gore) विवाहबंधनात अडकली आहे.

अपूर्वा गोरेनं अंशुमन जोशी (Anshuman Joshi) या अभिनेत्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे.

अपूर्वा गोरेनं लग्नाचे फोटो शेअर करत "श्री व सौ… #अपूर्ववंश" असे हृदयस्पर्शी कॅप्शन दिले आहे.

अपूर्वा आणि अंशुमनचे हे फोटो पाहून सेलिब्रिटींसह चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्रीच्या घरी गेले तीन-चार दिवस लग्नाची लगबग सुरू होती. अपूर्वाने तिच्या ग्रहमख आणि मेंहदी सोहळ्याचे सुंदर फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अपूर्वानं आपल्या मेंहदीत तिने नारिंगी रंगाचा अतिशय मोहक ड्रेस परिधान केला होता. तर अंशुमनने तिला मॅचिंग असा लूक केला होता.

दोघेही फोटोमध्ये एकमेकांच्या सोबतीने खूप आनंदी आणि उत्साही दिसत आहेत.

या आनंदाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा विधी म्हणून अपूर्वाच्या घरी 'ग्रहमख' विधीही अतिशय उत्साहात पार पडला होता. अपूर्वाने या विधीसाठी आईची ४० वर्ष जुनी जांभळ्या रंगाची शालू साडी नेसली होती.

अभिनेत्रीचा नवरा अंशुमन जोशी 'शाळा' या सिनेमासाठी आजही ओळखला जातो. २०१२ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. शाळा सिनेमात अंशुमन केतकी माटेगावकरसोबत झळकला होता.

अभिनेत्री अपूर्वा गोरेनं अंशुमन जोशीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियात शेअर केले आहे. लग्नाआधी त्यांनी खास फोटोशूट केलं होतं.

















