अमृता-प्रसादच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात; ग्रहमखाचे फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 09:46 IST2023-11-16T09:37:30+5:302023-11-16T09:46:15+5:30
Amrtua-Prasad wedding: सध्या सोशल मीडियावर या जोडीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे या जोडीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. बिग बॉस मराठीच्या घरात एकत्र झळकलेली ही जोडी खऱ्या अर्थाने
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अमृता देशमुख आणि प्रसाद जावेद ही जोडी लवकरच लग्नबंधनात बांधली जाणार आहे.
सध्या त्यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरु झाली आहे. अमृता आणि प्रसाद यांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अमृताने इन्स्टाग्रामवर लग्नापूर्वीच्या विधींचे काही फोटो शेअर केले आहेत.
अमृताच्या घरी नुकताच ग्रहमखाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात अमृता आणि प्रसाद कमालीचे सुंदर दिसत होते.
अमृताने डार्क हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तर, प्रसादनेदेखील डिझायन कुर्ता परिधान केला आहे.
अमृताने नऊवारी नेसल्यामुळे त्याला साजेसा पारंपरिक मराठमोळा लूक क्रिएट केला आहे. तिची ही साडी तिला तिच्या मावशीने गिफ्ट केली आहे.
अमृता-प्रसादने या ग्रहमखाच्या निमित्ताने खास फोटोशूटही केलं आहे.