अबोली मालिकेतील 'मनवा'चं सुंदर फोटोशूट; ग्लॅमरस लूकची होतेय चर्चा, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 17:53 IST2025-03-17T17:45:40+5:302025-03-17T17:53:21+5:30

अभिनेत्री कोमल कुंभारचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो.

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेमुळे अभिनेत्री कोमल कुंभार नावारुपाला आली.

या लोकप्रिय मालिकेत तिने अंजली नावाचं पात्र साकारलं होतं. तिच्या या पात्राला प्रेत्रक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.

सध्या कोमल स्टार प्रवाह वरील 'अबोली' मलिकेत काम करताना दिसते आहे.

अबोली मध्ये 'मनवा' नावाची व्यक्तिरेखा ती निभावते आहे.

नुकत्याच पार पडलेल्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कारसाठी अभिनेत्रीने डिझायनर साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे. तपकिरी रंगाच्या साडीत कोमलचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.

अभिनेत्रीने तिचे हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते प्रचंड व्हायरल होत आहेत.

कोमल या फोटोंमध्ये फार सुंदर दिसते आहे.