‘मालगुडी डेज’मधील स्वामी आठवतो? सध्या कुठे आहे, काय करतो?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 15:52 IST2020-05-14T15:52:30+5:302020-05-14T15:52:30+5:30
आता कसा दिसतो स्वामी?

लॉकडाऊनमुळे दूरदर्शनवर अनेक लोकप्रिय मालिका पुन्हा प्रसारित झाल्यात. अशीच एक मालिका म्हणजे, ‘मालगुडी डेज’. या मालिकेतील स्वामी तुम्हाला आठवत असेलच.
गिरीश कर्नाड यांच्या या मालिकेची गणना एपिक सीरिअल्समध्ये केली जात. यात स्वामीची मध्यवर्ती भूमिका होती. या स्वामीचे खरे नाव मंजूनाथ. हा मंजूनाथ सध्या कुठे आहे? काय करतो?
मंजूनाथने केवळ वयाच्या तिस-या वर्षापासून अॅक्टिंगला सुरुवात केली होती.
68 कन्नड,तेलगू, हिंदी सिनेमांमध्येही त्याने काम केले. पण त्याची स्वामी ही भूमिका सर्वाधिक गाजली.
अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ या चित्रपटातही मंजूनाथ दिला होता.
मंजूनाथने 19 व्या वर्षी अॅक्टिंगला रामराम ठोकला.
सध्या तो पीआर प्रोफेशनल आहे. त्याचे लग्न झालेय आणि त्याचे कुटुंब आहे.