रसिका वेंगुर्लेकरचं क्लास फोटोशूट; नेटकऱ्यांमध्ये होतीये तिच्या फिटनेसची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:27 IST2023-11-22T16:23:10+5:302023-11-22T16:27:01+5:30

Rasika vengurlekar: रसिकाने इन्स्टाग्रामवर तिचे काही निवड फोटो शेअर केले आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर.

उत्तम अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यामुळे रसिका लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे.

रसिका सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते.

अलिकडेच रसिकाने इन्स्टाग्रामवर तिचे काही निवड फोटो शेअर केले आहेत.

रसिकाने ब्लॅक अँड गोल्डन रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.

Gorgeous Nari in Gorgeous Saree असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

दिल दोस्ती दुनियादारी, फ्रेशर्स सारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

रसिकाने २०१८ मध्ये अनिरुद्ध शिंदे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. रसिकाचा नवरा कलाविश्वाशी निगडीत आहे. तो प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. रसिकाच्या नवऱ्याने 'का रे दुरावा', 'फ्रेशर्स' सारख्या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.