'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं घेतलं स्वप्नातलं घर; शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 12:22 IST2023-09-10T11:56:00+5:302023-09-10T12:22:53+5:30
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा प्रेक्षकांना खळखळून हसवणारा शो. या कार्यक्रमातील विनोदाची डबल डेकर म्हणजेच प्रसाद खांडेकर. सध्या तो चर्चेत आला आहे. कारण, त्यानं स्वत:चं घर खरेदी केलं आहे.

आपलं घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्नच असतं. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सध्या त्यांचं नव्या घराचं स्वप्न पूर्ण करताना दिसत आहेत. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता प्रसाद खांडेकरनेही स्वत:चं घर खरेदी केलं आहे. प्रसाद खांडेकरने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

नव्या घराच्या गृहप्रवेश पूजन सोहळ्याचे फोटो प्रसादने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं की, 'नवीन घर, अजून एक स्वप्न पूर्ण झालं. घर शोधायला लागलं १ वर्ष, घर बांधायला गेले ६ महिने, घर सजवायला २ महिने, फायनली, नवीन घरात शिफ्ट झालो. जुन्या दोन्ही घरांनी भरभरून दिलं…त्या दोन्ही वास्तूंचे आभार, मोरया!”.

या फोटोंमध्ये त्याचे कुटुंबीय आणि हास्यजत्रेतील कलाकार दिसत आहेत.

प्रसाद खांडेकरने नव्या घरासाठी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेली नेमप्लेट तयार करून घेतली. या नेमप्लेटवर कॅमेरा, पेन, पाहायला मिळत आहे.

या पोस्टवर चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी लाडक्या प्रसादला पुढील आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. प्रसादच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.

प्रसादच्या पत्नीचं नाव अल्पा आहे. प्रसाद आणि अल्पा यांचं लव्हमॅरेज. दोघांनाही श्लोक नावाचा एक गोंडस मुलगा आहे.

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशी प्रसाद खांडेकरची ओळख आहे.

हिंदी आणि गुजराती रंभभूमीवरही त्याने लेखक दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटविला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो घराघरात लोकप्रिय झाला.

प्रसाद सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. आपल्या पत्नी व मुलासोबतचे फोटो तो सतत शेअर करत असतो.

















