लंडनमधून शिक्षण घेतलं, बॉबी देओलसोबत केलं काम; आता गाजवतेय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', कोण आहे ही हसीना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:29 IST2025-05-20T16:24:41+5:302025-05-20T16:29:05+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीच्या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोने अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे ईशा डे.
ईशाने लंडन स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. सध्या ईशा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवत आहे.
ईशाने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. बॉबी देओलच्या आश्रम या वेब सीरिजमध्येही ती झळकली होती.
गुलकंद या सिनेमातून ईशा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमात प्रसाद ओक, समीर चौघुले, सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
या सिनेमाच्या निमित्ताने ईशाने नुकतंच फोटोशूट केलं आहे. पांढऱ्या रंगाचं ब्लेझर आणि स्कर्ट तिने परिधान केला आहे.
केस मोकळे सोडत ईशाने ग्लॅमरस लूक केला आहे. हाय हिल्स घालत तिने फॅशन केली आहे.
ईशाचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.