शिवाली परबनंतर हास्यजत्रेतील अभिनेत्याचं घराचं स्वप्न साकार! फोटोतून दाखवली टुमदार बंगल्याची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 07:00 PM2024-05-21T19:00:00+5:302024-05-21T19:00:02+5:30

आलिशान एन्ट्री, छोटं टेरेस अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा टुमदार बंगला पाहून डोळे दीपतील

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने काही दिवसांपूर्वीच नव्या घरात गृहप्रवेश केला. आता हास्यजत्रा फेम प्रथमेश शिवलकरच्या घराचं स्वप्नही पूर्ण झालं आहे.

प्रथमेशने शेतात बंगला बांधला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने बंगल्याची झलक दाखवली आहे.

शहरापासून दूर प्रथमेशने गावी शेतात टुमदार बंगला बांधला आहे. 'शिवार्पण' असं नाव त्याने त्याच्या नव्या घराला दिलं आहे.

बंगल्याच्या नावाखाली सरस्वती काढल्यांचं फोटोत पाहायला मिळत आहे.

बंगल्यात एन्ट्री घेतानाच फर्निचरचं इंटेरियर केल्याचं दिसत आहे. तर बंगल्याला छोटसं टेरेसही असल्याचं पाहायला मिळत आहे.

संपूर्ण बंगल्याला रोषणाई केल्याचंही दिसत आहे. बंगल्याचे फोटो शेअर करत त्याने स्वप्नातली वास्तू साकार झाल्याचं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रथमेशने महिंद्रा थार ही गाडी खरेदी केली होती.

प्रथमेशला चाहते आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छा देत त्याचं अभिनंदनही केलं आहे.

अभिनय करण्याबरोबरच प्रथमेश उत्तम लेखकही आहे. त्याने हास्यजत्रेतील अनेक स्किटचं लेखन केलं आहे.