द्रोपदीच्या वस्त्रहरण सीनच्या वेळी सेटवर लागली आग, दैवी शक्तीचाही झाला भास! 'महाभारत' फेम अभिनेत्रीचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:38 IST2024-11-14T16:30:16+5:302024-11-14T16:38:25+5:30
२०१३ साली टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'महाभारत' मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेत पूजाने द्रोपदीची भूमिका साकारली होती.

२०१३ साली टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'महाभारत' मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं.
सौरभ जैन, पूजा शर्मा, शाहीर शेख, अहम शर्मा, पुनीत भट, अंकित मोहन अशी या मालिकेची स्टारकास्ट होती. या मालिकेत पूजाने द्रोपदीची भूमिका साकारली होती.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पूजाने मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान आलेले काही प्रसंग सांगितले.
द्रोपदीच्या वस्त्रहरणाचा सीन सुरू होता त्यावेळेस सेटवर दोनदा आग लागल्याचं तिने सांगितलं.
"सेटवर एक जागा होती जिथून द्रोपदीची साडी दाखवायची होती. तिथे एक ट्रान्सफॉर्मर ठेवण्यात आलं होतं. ज्याला दोन वेळा आग लागली होती".
"हा फारच भावनिक सीन होता. त्यामुळे सेटवरही तणाव जाणवत होता. सीन शूट करताना कृष्ण साकारणाऱ्या अभिनेत्याने कॅमेराकडे बघताच एक घटना घडली".
"ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन विस्फोट झाले आणि आग लागली. मला तिथे दैवी शक्ती असल्याचाही भास झाला", असं अभिनेत्रीने सांगितलं.
"महाभारत मालिकेच्या शूटिंगमध्ये मी कधीच असं पाहिलं नव्हतं. मला कधीच असं जाणवलंही नव्हतं".