'माधवी भिडे'चा कधीही न पाहिलेला बोल्ड अंदाज, अभिनेत्रीच्या फोटोशूटवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:34 IST2025-05-20T15:34:11+5:302025-05-20T16:34:26+5:30

तारक मेहता का उलटा चष्मा मधील माधवी भिडेने सोशल मीडियावर शेअर केलेलं बोल्ड फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'माधवी भिडे'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी. सोनालिका मालिकेत साध्या, सोज्वळ अंदाजात दिसते

सोनालिका जोशी सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे. शोमध्ये साध्या साडीत दिसणाऱ्या माधवी भिडेने केलेलं फोटोशूट अत्यंत स्टायलिश आणि बोल्ड आहे.

सोनालिकाने अलीकडेच तिचं एक जुनं फोटोशूट शेअर केलं आहे. ज्यात ती काळ्या रंगाच्या घागरा-चोलीमध्ये दिसत आहे.

सोनालिकाने केलेल्या या लुकमध्ये तिने मोठी लाल बिंदी, जंक ज्वेलरी, कमरबंद आणि नोजरिंग परिधान केली आहे. तिच्या ओपन हेअरस्टाइल आणि स्मोकी आय मेकअपमुळे तिचा लुक अधिकच आकर्षक वाटतोय.

सोनालिकाने केलेल्या या फोटोशूटमधील तिच्या बोल्ड पोजेसमुळे सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोनालिकाने रिअल लाइफमध्ये असंच फोटोशूट करताना दिसते. कायमच कंफर्ट झोनच्या बाहेर येत वेगवेगळ्या लूकमध्ये सोनालिका फोटोशूट करताना दिसते

सोनालिका जोशी गेल्या १५ वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करत आहे. या शोमध्ये सोनालिकाने साकारलेली माधवीची भूमिका चांगलीच गाजली.