नखरेल नार! गुलाबी रंगाच्या साडीत खुललं गौतमीचं सौंदर्य; नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:45 IST2024-11-18T18:35:12+5:302024-11-18T18:45:47+5:30

सोशल मीडियास्टार लावणी डान्सर गौतमी पाटीलची सर्वत्र चर्चा होताना दिसते.

'पाटलांचा बैलगाडा’, ‘पाव्हणं जेवला काय’ या गाण्यांवर जबरदस्त डान्स करून मन जिंकणारी गौतमी पाटील तिच्या नृत्यकौशल्याने चाहत्यांना घायाळ करत असते.

अलिकडेच गौतमी 'लाइक आणि सबस्क्राइब' चित्रपटामधील 'लिंबू फिरवलं' या आयटम साँगमध्ये झळकली.

त्यामध्ये गौतमीने केलेल्या नृत्याचं सर्वांनी कौतुक केलं.

गौतमी पाटील सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह असते. तिच्या संदर्भात अपडेट्स ती याद्वारे चाहत्यांना देत असते.

नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाची साडी नेसून काढलेले फोटो पोस्ट केले आहेत.

नाकात मोत्याची नथ, गळ्यात हार असा साज तिने केला आहे.

गौतमीचा फोटोंमधील सोज्वळ लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.