नाकात नथ अन् कानात झुमके, गौतमीच्या साडीतील फोटोंनी घातला धुमाकूळ; चाहते म्हणाले- "सूरजबरोबर सिनेमा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:53 IST2024-10-23T16:45:01+5:302024-10-23T16:53:55+5:30
गोतमीने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा नखरेल अंदाज पाहायला मिळत आहे.

लावणी डान्सर गौतमी पाटीलला कोण ओळखत नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच गौतमीचे चाहते आहेत.
गौतमीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तिच्या शोला होणाऱ्या गर्दीवरुनच तिची क्रेझ आहे हे लक्षात येतं.
गोतमीने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा नखरेल अंदाज पाहायला मिळत आहे.
हिरव्या रंगाच्या साडीत गौमतीने पारंपरिक लूक केल्याचं दिसत आहे. नाकात नथ आणि कानात झुमके असा साज केला आहे.
केस मोकळे सोडल्याने गौतमीच्या सौंदर्यात भर पडली आहे.फोटोसाठी तिने पोझही दिल्या आहेत.
गौतमीच्या चेहऱ्यावरील निखळ हास्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. तिचे हे फोटो चर्चेत आहेत.
गौतमीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने गौतमीने सूरज चव्हाणसोबत सिनेमा काढण्याची मागणी केली आहे.
सबसे कातिल गौतमी पाटील अशा कमेंटही गौतमीच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या आहेत.