'कुलवधू' मालिकेतील देवयानी आठवते? अनेक वर्ष इंडस्ट्रीपासून दूर, आता ओळखूच शकणार नाही

By देवेंद्र जाधव | Updated: August 20, 2025 13:46 IST2025-08-20T13:35:19+5:302025-08-20T13:46:28+5:30

'कुलवधू' मालिकेतील देवयानीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या

'कुलवधू' मालिका सर्वांना आठवत असेलच. या मालिकेत मुख्य भूमिका साकारली अभिनेत्री पूर्वा गोखलेने. पूर्वाने मालिकेत देवयानीची भूमिका साकारली

'कुलवधू' मालिकेतील पूर्वाने साकारलेली देवयानीची भूमिका चांगलीच गाजली. याशिवाय पूर्वा आणि सुबोध भावेची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडली

'कुलवधू' मालिकेनंतर पूर्वा मराठी रंगभूमीवर काम करताना दिसली. इतकंच नव्हे हिंदी मालिकांमध्ये पूर्वाने लोकप्रियता मिळवली

'कुलवधू' मालिकनंतर पूर्वा गोखलेने ‘झनक’ या हिंदी मालिकेत साकारलेली ‘सृष्टी मुखर्जी’ ही नकारात्मक भूमिका चांगलीच गाजली. पण सध्या मात्र पूर्वा इंडस्ट्रीपासून दूर आहे

'कुलवधू' मालिकेतील साधी - सोज्वळ पूर्वा आता ओळखूच येणार नाही. पूर्वा सध्या इंडस्ट्रीपासून दूर असून ती कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते

पूर्वाचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. पूर्वाने खऱ्या आयुष्यात केदार गोखलेंशी विवाह केला असून त्यांना दोन मुली आहेत.

पूर्वा गोखलेचे चाहते आजही तिला मिस करतात. याशिवाय तिच्या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत