"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:50 IST2025-09-20T18:36:14+5:302025-09-20T18:50:42+5:30
अभिनेत्याने चित्रपटांमध्ये काम करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता.

"स्पेशल ऑप्स २" या वेब सिरीजमध्ये दिसलेला करण टॅकर सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान करणने त्याच्या संघर्षांबद्दल मोकळेपणाने संवाद साधला.
करणने सांगितलं की, त्याचा "एक हजारों में मेरी बहना है" हा शो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता, पण नंतर एक वेळ अशी आली की सर्वांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला.
अभिनेत्याने त्या काळात चित्रपटांमध्ये काम करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. कारण टीव्ही मालिकेच्या यशाची खात्री कमी होत चालली होती.
करणने शो सोडला आणि चित्रपटांसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. करण जवळजवळ सात वर्षे खूप स्ट्रगल केला, या काळात तीन वर्षे घरीच होता.
छोटी-मोठी काम करून तो दिवस काढत होता. इन्स्टंट बॉलिवूडशी बोलताना करण म्हणाला, "जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा मला थोडं वाईट वाटायचं."
"जेव्हा तुमचा मूड चांगला नसतो तेव्हा तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी येते. छोट्या छोट्या गोष्टींचं खूप वाईट वाटतं. मी ती फेजही अनुभवली आहे."
करण अनुपम खेर निर्मित "तन्वी" चित्रपटात दिसला होता. तो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी न्यू यॉर्कला गेला होता.