'माझी तुझी रेशीमगाठ' फेम काजलचा नवरा कमवतोय क्रिकेटविश्वात नाव; 'मुंबई इंडियन टीम'सोबत आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 01:51 PM2024-06-24T13:51:01+5:302024-06-24T14:24:48+5:30

Kajal kate: विशेष म्हणजे प्रतिक आणि काजलचं लग्न झालं आणि लग्नानंतर लगेच त्याला मुंबई इंडियन्सकडून ऑफर आली.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत शेफाली ही भूमिका साकारुन लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे काजल काटे.

काजलने आजवरच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते.

सध्या नेटकऱ्यांमध्ये काजलच्या नवऱ्याची चर्चा रंगली आहे. काजलच्या नवऱ्याचे क्रिकेटजगताशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे तिच्यासोबतच तिच्या नवऱ्याचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते.

काजलच्या नवऱ्याचं नाव प्रतिक कदम असं असून मुंबई इंडियन्स टीमसाठी तो महत्त्वाची जबाबदारी बजावत आहे.

काजल आणि प्रतिक या दोघांचं सूत एका मेट्रोमोनियल साईटमुळे जुळलं आहे. एका मुलाखतीमध्ये काजलने तिच्या नवऱ्याविषयी आणि तिचं लग्न कसं ठरलं हे सांगितलं होतं.

रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर प्रतिक आणि काजल एकमेकांना भेटले. आणि, त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही घरच्यांना आधी भेटलो आणि मग लग्नाचं सगळं फायनल केलं.

विशेष म्हणजे प्रतिक आणि काजलचं लग्न झालं आणि लग्नानंतर लगेच त्याला मुंबई इंडियन्सकडून ऑफर आली.

प्रतिक मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच आहे. बऱ्याचदा तो सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या प्लेयर्स सोबत फोटो शेअर करत असते.