'स्वामी समर्थ'फेम साधीभोळी चंदा खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस; मॉर्डन लूकमध्ये वेधतीये नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 15:01 IST2022-03-17T15:01:34+5:302022-03-17T15:01:34+5:30

Vijaya Babar: या मालिकेतील प्रत्येक कलाकार उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मात्र, त्यातील चंदा विशेष लोकप्रिय झाली आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'जय जय स्वामी समर्थ'. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या मालिकेतील प्रत्येक कलाकार उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मात्र, त्यातील चंदा विशेष लोकप्रिय झाली आहे.

स्वामींच्या सेवेत लीन असलेली चंदा तिच्या साधेपणामुळे, निस्सिम भक्तीमुळे लोकप्रिय होत आहे.

मात्र, मालिकेत दिसणारी साधीभोळी चंदा खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर हिने चंदाची भूमिका साकारली आहे.

जय जय स्वामी समर्थ ही विजयाची पहिलीच मालिका असून यापूर्वी तिने अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे.

विजया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.