Ankita Lokhande House: अगदी राजमहाल...! या ८ बेडरूमच्या अलिशान घरात राहते अंकिता लोखंडे, पाहा खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 13:55 IST2023-03-31T13:46:05+5:302023-03-31T13:55:28+5:30
Ankita Lokhande House: होय, अंकिता तिचा पती विकी जैनसोबत एका अलिशान घरात राहते. तिचं हे घर अगदी राजमहालासारखं सुंदर आहे.

अंकिता लोखंडे या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. नवऱ्यासोबतचे एक ना अनेक फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. सध्या काय तर तिच्या घराची चर्चा आहे.
होय, अंकिता तिचा पती विकी जैनसोबत एका अलिशान घरात राहते. तिचं हे घर अगदी राजमहालासारखं सुंदर आहे.
ऐसपैस हॉल, तसेच पांढऱ्या शुभ्र रंग अंकिताने संपूर्ण घराला दिला आहे. या घरातील प्रत्येक गोष्ट युनिक आहे. अगदी हॉलमधल्या झुंबरापासून तर भींतीवरच्या फोटो फ्रेमपर्यंत सगळं युनिक आहे.
अंकिता लग्नानंतर नव्या घरात शिफ्ट झाली. ८ बेडरूम हॉल किचनच्या या लक्झरी घरात अंकिता शानदार आयुष्या जगतेय.
तिच्या घराचा हॉल प्रशस्त आहे. या हॉलमधील पांढरा सोफा लक्ष वेधून घेतं. अख्खं घर व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये सजवण्यात आलं आहे.
बेडरूमपासून तर लिव्हिंग रूमपर्यंत सगळं पांढरं शुभ्र आहे. बाल्कनी सुंदर सुंदर झाडांनी सजलेली आहे. याठिकाणी अंकिता फावला वेळ घालवते.
अंकिताच्या घरातील पूजाघरही सुंदर आहे. अंकिता प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा करते. या फोटोत तिचं देवघर दिसतंय.
विकी आणि अंकिताने लग्नाआधी दोन वर्षांपूर्वी मुंबईत नवीन घर घेतलं होतं. पण कोरोना महामारीमुळे काम पूर्ण न झाल्यामुळे ते त्यांच्या घरी शिफ्ट होऊ शकले नव्हते. आता मात्र ती व विकी या नव्या घरात शिफ्ट झाले आहेत.
अंकिता व विकी जैन यांनी 14 डिसेंबर 2021ला लग्नगाठ बांधली होती. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे.
अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये अंकिताचा पती विकीचा बिझनेस आहे. विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे.
अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलं आणि यानंतर वडिलोपार्जित व्यवसायात त्याने स्वत:ला झोकून दिलं.