मालिकांमधील आघाडीची अभिनेत्री वयाच्या ५० व्या वर्षीही अविवाहित, आहे एका दत्तक मुलीची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 11:43 AM2023-12-08T11:43:08+5:302023-12-08T12:12:13+5:30

हिंदी मालिकेतील 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत असतं

टीव्हीवर एकेकाळी एकता कपूरच्या मालिकांनी धुमाकूळ घातला होता. 'क' अक्षरापासून मालिका करणं ही एकताची खासियतच होती. तिच्या मालिकांमधून अनेक कलाकार रातोरात स्टार झाले. श्वेता तिवारी, स्मृती ईरानी, साक्षी तंवर या अभिनेत्री त्यापैकीच एक.

आजही तिच्या मालिका टॉपवर असतात. मात्र तो काळ वेगळाच होता जेव्हा 'कसोटी जिंदगी की','क्योंकी सांस भी कभी बहु थी','कहानी घर घर की' या मालिका गाजल्या होत्या.

साक्षी तंवर (Sakshi Tanwar) म्हणजे टीव्ही विश्वातील आघाडीची अभिनेत्री. वयाच्या ५० व्या वर्षीही तिची लोकप्रियता कायम आहे. 'कहानी घर घर की' पासून ते 'बडे अच्छे लगते है' पर्यंत तिच्या अनेक मालिका गाजल्या.

याशिवाय साक्षीने सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या. 'दंगल' चित्रपटात तिने आमिर खानच्या पत्नीची भूमिका उत्तम निभावली. तसंच गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'सम्राट पृथ्वीराज' मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली.

साक्षी ५० वर्षांची असून अद्याप अविवाहित आहे. तिने 2018 मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेतले. यानंतर साक्षी सिंगल मदरची जबाबदारी पार पाडत आहे. तिचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत राहिलं आहे.

साक्षीला अद्याप अविवाहित असल्याचं कारण विचारलं असता ती म्हणाली,'मला असा कोणीही जीवनसाथी मिळाला नाही ज्याच्यासोबत मी संपूर्ण आयुष्य घालवू शकेन. मला वाटतं तुमचा जन्म, मृत्यू, लग्न अशा सर्व गोष्टी आधीच ठरलेल्या आहेत.

ती पुढे म्हणाली,'माझा लग्नावर विश्वास नाही असं अजिबातच नाही. मी माझ्या आसपास अनेक जोड्यांचे संसार यशस्वी झालेले पाहिले आहेत.'

साक्षीने 2001 साली 'करम' मालिकेतून टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानंतर तिने 'संसार','कुटुंब','देवी','विरासत' अशा अनेक सुपरहिट मालिका दिल्या होत्या. साक्षीला कहानी घर घर की मधून कमालीची लोकप्रियता मिळाली. आज ती एका एपिसोडसाठी सुमारे दीड लाख रुपये घेते.