BMW कार अन् मुंबईत स्वत:चं घर; अवघ्या २२ व्या वर्षात अभिनेत्रीने केली कमाल, शेअर केले नव्या घरातील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:51 IST2024-12-13T16:41:34+5:302024-12-13T16:51:09+5:30
'बालवीर', 'झांसी की रानी' आणि 'खतरों के खिलाडी सीझन-११' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री अनुष्का सेन नावारूपाला आली.

शिवाय 'दिल दोस्ती डिलेमा' सीरिजमध्ये देखील ती पाहायला मिळाली. अलिकडेच अनुष्का सेनला कोरिया आणि भारतातील नातं घट्ट करण्यासाठी कोरियन सरकारकडून एक प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला.
अनुष्का सेन हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनुष्का सेन मुळची रांचीमधील असून तिचा जन्म एका बंगाली कुटुंबात झाला. अगदी कमी वयातच साधारणत: २००९ मध्ये तिने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.
वयाच्या १९ व्या वर्षी तिने BMW कार खरेदी केली, आता मायानगरी मुंबईत तिने हक्काचं घर खरेदी केलंय.
अनुष्का सेन सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर चाहतावर्गही फार मोठा आहे.
त्यामुळे तिच्याबाबतीत जाणून घेण्यास तिचे चाहते देखील उत्सुक असतात.
नुकतीच अनुष्का सेनने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती मुंबईतील नव्या घरात शिफ्ट झाल्याची माहिती तिने चाहत्यांना दिली आहे.
"सेन कुटुंबीयांच्या नव्या घरातील पहिला दिवस..." असं कॅप्शन देत अनुष्काने मुंबईतील घराची झलकही दाखवली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सद्वारे तिला शुभेच्छा दिल्या आहेत.