हिना खान अभिनयसोबतच या गोष्टीत आहे एक्सपर्ट, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 16:44 IST2020-03-31T16:21:40+5:302020-03-31T16:44:14+5:30

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत.

सेलिब्रेटी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. तसेच आपल्या विविध छंदांसाठी वेळ देत आहेत.

हिना खान ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली पेंटर आहे. सध्या ती तिचा वेळ पेटिंगसाठी देत आहे.

हिना विविध पेटिंग काढत असून हे पेटिंग्स सोशल मीडियावर शेअर करत आहे.

हिनाचे हे पेंटिग्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

हिना एक खूप चांगली पेंटर असल्याचे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

हिनाने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली असून ती बिग बॉसमध्ये देखील झळकली होती.