'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावलीच्या रिअल लाइफमधील आईला पाहिलंत का?, दिसते तिच्यासारखी सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:45 IST2025-06-13T17:42:15+5:302025-06-13T17:45:47+5:30

savalyachi janu savali Serial : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावलीच्या भूमिकेतून अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'सावळ्याची जणू सावली'. या मालिकेत सावलीची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने साकारली आहे.

अभिनेत्री प्राप्ती रेडकर 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेतून घराघरात चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेनंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

प्राप्ती रेडकर हिने अभिनय क्षेत्रात बालकलाकार म्हणून पदार्पण केले. ‘किती सांगायचंय मला’ ही तिची पहिली मालिका होती.

प्राप्ती रेडकरच्या या प्रवासात तिला तिच्या आई वडिलांची चांगली साथ लाभली आहे.

प्राप्ती रेडकरच्या आईचं नाव ज्योती रेडकर असून तीदेखील लेकीप्रमाणेच दिसायला सुंदर आहे.

प्राप्ती रेडकर बऱ्याचदा आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते आणि तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.

प्राप्ती रेडकरची आई ज्योती आणि वडील प्रवीण यांनादेखील गायन आणि नृत्याची आवड आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात.

प्राप्ती रेडकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने ‘किती सांगायचंय मला’ या मालिकेव्यतिरिक्त ‘तू माझा सांगाती’, ‘मेरे साई’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे.

सध्या ती सावळ्याची जणू सावली मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते आहे.