'घरोघरी मातीच्या चुली'मधील जानकीचा ऑफ-स्क्रीन लूक व्हायरल; ग्लॅमरस फोटोंनी वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 18:30 IST2026-03-18T17:59:32+5:302026-03-18T18:30:55+5:30

भलतीच ग्लॅमरस आहे टिव्हीची संस्कारी सून, 'घरोघरी मातीच्या चुली'मधील जानकीचा ऑफ-स्क्रीन लूक व्हायरल

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेली मालिका म्हणजे 'घरोघरी मातीच्या चुली'. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या मालिकेतील प्रमुख पात्र 'जानकी' ही प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

अगदी साध्या आणि सोज्वळ सुनेच्या रूपात दिसणारी ही 'जानकी' खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.

'जानकी' ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव रेश्मा शिंदे असं आहे. रेश्माचं फॅन फॉलोविंगही प्रचंड आहे. ती तिच्या कामाबाबत आणि पसर्नल आयुष्याबाबतही चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकतंच रेश्मानं सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतोय.

काळ्या सिक्विन असलेल्या मरमेड गाऊनमध्ये ती प्रचंड सुंदर आणि हॉट दिसत आहे.

मालिकेतील साधेपणामुळे तिला ओळखणेही कठीण झाले आहे, इतकी ती खऱ्या आयुष्यात वेगळी आणि आकर्षक दिसते.

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेमुळे रेश्माच्या अभिनयाची प्रशंसा होत असतानाच, तिच्या या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रेश्माच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहतेही फिदा झाले आहेत. तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव चाहते करताना दिसत आहेत.

याआधी रेश्मा ''रंग माझा वेगळा'' मालिकेत दिसली होती. या मालिकेनेच तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.

रेश्माचा पती पवन हा साऊथ इंडियन आहे. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रेश्माने पवनशी लग्न केलं.