गौतमी पाटीलने 'खास' लोकांसोबत साजरा केला वाढदिवस, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:04 IST2026-02-08T14:55:19+5:302026-02-08T15:04:34+5:30

गौतमी पाटीलचा फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस असतो. यंदा तिने तिचा वाढदिवस खास पद्धतीने सेलिब्रेट केला.

सबसे कातील गौतमी पाटील... लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलची महाराष्ट्रात खूप क्रेझ आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला लोकांची तुफान गर्दी असते.

नुकतंच गौतमीनं आपला वाढदिवस साजरा केला. सामाजिक बांधिलकी जपत तिनं मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं.

गौतमी पाटीलने आपला वाढदिवस 'श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित, निवासी मतिमंद विद्यालय' येथील मुलांसोबत साजरा केला.

गौतमी पाटीलने केवळ केक कापला नाही, तर मुलांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. गौतमीच्या या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गौतमीने यावेळी सुंदर ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूपच क्युट दित होती. गौतमीच्या या संवेदनशील निर्णयामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, काही दिवसांआधीही गौतमीनं एका अनाथाश्रमाला भेट दिली होती. तिथल्या लहान मुलींनी गौतमीला प्रेमाने कडकडून मिठी मारत, त्यांना जवळ घेत मायेने विचारपूस केली होती.

सध्या गौतमीला अनेक मराठी सिनेमांमध्येही डान्स नंबर करण्याची संधी मिळत आहे. एकूणच तिचं करिअर आता सुसाट आहे.

अलिकडेच ती गायक अभिजीत सावंतच्या 'रुपेरी वाळूत' अल्बममध्ये झळकली होती.