आली गौराई, धनधान्याच्या पावलानं... अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या घरी गौरींचे आगमन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 17:55 IST2024-09-11T17:43:01+5:302024-09-11T17:55:11+5:30
मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले असून काहींच्या घरी गौराईदेखील विराजमान झाली आहे.

गणरायाच्या आगमनानंतर वेध लागतात ते गौरींचे. मंगळवारी गौरींचे घरोघरी आगमन झाले. प्रत्येक कुटुंबाने आपापल्या चालिरीती, प्रथेनुसार गौराईचे स्वागत केले.
अभिनेत्री अश्विनी महांगडे गौरी सणासाठी आपल्या गावी गेली आहे.
भिनेत्रीने सोशल मीडियावर गावाकडचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी ती घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवताना पाहायला मिळाली.
अश्विनी महांगडेच्या घरीदेखील गौरीचं आवाहन झालं आहे. तिच्या घरचं गौराईचं मखर अगदी सुंदर सजवल्याचं फोटोत दिसतंय.
अश्विनी चुलीवरच्या भाकरीचा फोटो इस्टा स्टोरीवर शेअर केलाय. "आज आमच्या गौराईसाठी भाकरी" असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं.
अश्विनीचा सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. तीदेखील या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
अश्विनी महांगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत राणूअक्काची भूमिका केली. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत काम करताना दिसते आहे.