Aishwarya Narkar : जाळ अन् धूर संगटच! ऐश्वर्या नारकर यांच्या साडीतल्या मनमोहक अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 18:25 IST2024-07-04T18:20:04+5:302024-07-04T18:25:29+5:30

Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी नुकतेच साडीतले फोटो शेअर केले आहेत.

ऐश्वर्या नारकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

ऐश्वर्या नारकर ५१ वर्षांच्या असल्या तरी त्यांच्या सौंदर्यापुढे तरूणीदेखील फिक्क्या पडतील.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर सक्रीय असून त्या बऱ्याचदा फोटो आणि रिल शेअर करत असतात.

नुकतेच त्यांनी साडीतले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोशूटमध्ये त्यांनी पिंक रंगाची चिकनकारी साडी परिधान केली आहे. साडीवर कानात झुमके आणि केस मोकळे सोडले आहेत.

या साडीतल्या ऐश्वर्या यांच्या मनमोहक अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहेत.

एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, ऐश्वर्या तुझ वय कधी वाढेल, तुझ्या वयाच घड्याळ बंद पडलं आहे

तर दुसऱ्या युजरने लिहिले की, लयभारी, सुंदर, लूक जाळच अशा कमेंट केल्या आहेत.