'दयाबेन'चा लेटेस्ट फोटो पाहिलात का? ओळखणंही झालंय कठीण; दिशा वकानी खूपच बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:08 IST2026-02-25T17:58:50+5:302026-02-25T18:08:06+5:30

दयाबेनला ओळखलंत का? आता दिसतेय अशी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गेल्या १६ वर्षांपासून टेलिव्हिजनवर राज्य करत आहे. ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या जवळचं आहे. त्यातलीच एक दयाबेन. अभिनेत्री दिशा वकानीने दयाबेनची भूमिका साकारली जिला कमालीचं प्रेम मिळालं.

दयाबेनची स्टाईलच अजब होती. तिची बोलण्याची पद्धत, गरबा खेळण्याची स्टाईल, तिचा आवाज एकंदर सगळ्यावरच प्रेक्षक खळखळून हसायचे.

दिशा वकानीने मालिका सोडून आता ७ वर्ष उलटून गेले आहेत. दोन मुलांच्या पालनपोषणातच ती व्यग्र आहे. २०१७ साली तिला पहिली मुलगी झाली. तर २०२२ साली तिने मुलाला जन्म दिला.

आता नुकतंच दिशा वकानीच्या लेटेस्ट फोटोवरुन तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तिचा लूक अगदीच बदललेला दिसत आहे.

निळ्या रंगाची प्रिंटेड कुर्ती आणि त्यावर तिने क्रीम रंगाची ओढणी घेतली आहे. डोळ्यावर मोठा चष्या आहे. दिशा एखाद्या बागेत आलेली दिसत आहे आणि कॅमेऱ्यासमोर हसत उभी आहे.

सर्वांना हसवणारी दिशा बऱ्याच वर्षांपासून आता घर-संसारातच व्यग्र झाली आहे. तिचे चाहते मात्र तिची अजूनही मालिकेत आठवण काढत आहेत आणि तिच्या कमबॅकची वाट पाहत आहेत.