‘देवमाणूस’मधील चंदा खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 08:00 IST2021-07-22T08:00:00+5:302021-07-22T08:00:11+5:30
‘देवमाणूस’ या मालिकेत एका नव्या चेहऱ्याची एन्ट्री झाली आणि आणि या नव्या चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा नवा चेहरा कुणाचा तर चंदाचा.

देवमाणूस या मालिकेत एका नव्या चेहऱ्याची एन्ट्री झाली आणि आणि या नव्या चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा नवा चेहरा कुणाचा तर चंदाचा.
होय, देवीसिंग ऊर्फ डॉ. अजित कुमार देवला थेट आव्हान देणारी चंदा चांगलीच चर्चेत आहे.
देवी सिंगची न्यायलयातून सुटका करताच त्यांच्या समोर एक बाई येते आणि कोणालाच न घाबरणारा, माणसांचे खुन करणाºया देवीसिंगची त्या बाईला पाहून शुद्ध हरपते. हीच ती चंदा.
चंदाची ही धाकड भूमिका अभिनेत्री माधुरी पवारने साकारलीये. ही माधुरी पवार खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे.
माधुरीला तुम्ही याआधी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत पाहिले असेलच. या मालिकेत माधुरीने वहिनी साहेबांची भूमिका साकारली होती.
‘तुझ्यात जीव रंगला’तील वहिनीसाहेबांची भूमिका आधी धनश्री काडगावकरने साकारली होती. पण तिने मालिकेला रामराम ठोकल्यावर माधुरीने नंदिता वहिनीच्या भूमिकेत मालिकेत दमदार एंट्री घेतली होती.
आता हीच वहिनीसाहेब ‘देवमाणूस’ या मालिकेत चंदा बनून आली आहे. सोशल मीडियावर तिची सध्या जोरदार चर्चा आहे.
माधुरी ही एक उत्तम नृत्यांगना असून तिने अप्सरा आली हा डान्स रिएलिटी शो देखील जिंकला होता.
माधुरी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. तिचे इन्स्टा अकाऊंट ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे.