अजूनही तसाच दिसतो 'दे धमाल'मधील झंप्या; आता काय करतो माहितीये? बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:33 IST2025-06-26T16:09:36+5:302025-06-26T16:33:41+5:30

'दे धमाल' मालिकेतील झंप्या तर प्रेक्षकांना विशेष आवडायचा. त्याचा खोडकर स्वभाव प्रेक्षकांना भावला होता. पण आता इतक्या वर्षांनी हा झंप्या आता कसा दिसतो? काय करतो? हे तुम्हाला ठाऊक आहे का?

झी मराठीच्या सगळ्यात गाजलेल्या आणि घराघरात पाहिल्या जाणाऱ्या जुन्या मालिकांमध्ये 'दे धमाल' या मालिकेचं नाव आवर्जुन घेतलं जायचं.

छोट्या मुलांच्या पराक्रमांची आणि मजा मस्ती दाखवणारी ही मालिका लोकप्रिय ठरली होती. मालिकेतील झंप्या, वरूण, निनाद, ऋतूजा, स्पृहा, शीतू, चीनू ही सगळीच पात्र चांगलीच गाजली.

'दे धमाल' मालिकेतील झंप्या तर प्रेक्षकांना विशेष आवडायचा. त्याचा खोडकर स्वभाव प्रेक्षकांना भावला होता.

पण आता इतक्या वर्षांनी हा झंप्या आता कसा दिसतो? काय करतो? हे तुम्हाला ठाऊक आहे का?

'दे धमाल' मालिकेत झंप्या ही भूमिका बालकलाकार भूषण धुपकर याने साकारली होती. भूषण आता मोठा झाला आहे.

मात्र अजूनही तो तसाच दिसतो. आजही भूषण अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

नकटीच्या लग्नाला यायचं हां , मेरे साई यासारख्या मालिकांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला.

त्याने बॉलिवूडमध्येही काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. ड्रीम गर्ल, गुडन्यूज यासारख्या चित्रपटात तो झळकला आहे.

भूषण सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. रील्समधून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. तर चाहत्यांना लाइफमधील अपडेट्स देत असतो.