'दामिनी' मालिकेमुळे पालटलं नशीब; आता काय करतात लेडी रिपोर्टर प्रतीक्षा लोणकर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:26 IST2026-03-10T13:18:21+5:302026-03-10T13:26:41+5:30
अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी 'दामिनी' मालिकेत महिला पत्रकार दामिनीची भूमिका साकारली होती.

'दामिनी' ही ९०च्या दशकातील टेलिव्हिजन गाजवलेली सगळ्यात लोकप्रिय मालिका. दूरदर्शनवर लागणारी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

'दामिनी' ही मराठीतील पहिली दैनंदिन मालिका होती. या मालिकेतून एका निर्भिड महिला पत्रकाराची कहाणी दाखवण्यात आली होती.

अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी 'दामिनी' मालिकेत महिला पत्रकार दामिनीची भूमिका साकारली होती.

या मालिकेने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी साकारलेली 'दामिनी' प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे.

'दामिनी' मालिकेनंतर प्रतीक्षा लोणकर मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय चेहरा बनल्या. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी टेलिव्हिजनही त्यांनी गाजवलं.

व्योमकेश बक्षी, सीआयडी, बंदिनी, अनुभुती, कहानी नही जीवन है, थपकी प्यार की या हिंदी मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत.

तर कळत नकळत, खरंच माझं चुकलं का?, संबंध या मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत त्या जिजाऊंच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

मराठी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. झपाटलेल्या बेटावर, पैज लग्नाची, बिनधास्त, ही पोरगी कुणाची, लेक लाडकी, मोकळा श्वास, लग्न कल्लोळ, शिवप्रताप गरुडझेप, सरकारनामा हे त्याचं गाजलेले सिनेमे.

इक्बाल, डोर, हॅट्रिक, हिरोज, वॉन्टेड, मीराबाई नॉट आऊट या हिंदी सिनेमांतही त्यांनी काम केलं आहे.

प्रतीक्षा लोणकर सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकत्याच निरोप घेतलेल्या अबोली मालिकेत त्या दिसल्या होत्या.

















