कुठे गायब झालाय CID फेम Vivek? 11 वर्षांनंतर आता ओळखणंही झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 12:22 IST2023-06-25T12:17:02+5:302023-06-25T12:22:05+5:30
Vivek mashru:विवेकने सीआयडीमध्ये ६ वर्ष काम केलं. त्यानंतर तो कलाविश्वातून गायब झाला.

90च्या दशकात तुफान गाजलेली मालिका म्हणजे सीआयडी (CID). ही मालिका त्याकाळी तुफान लोकप्रिय झाली.

या मालिकेने जवळपास २१ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांना आपलासा वाटतो.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील विवेकची चर्चा रंगली आहे. २०१८ साली ही मालिका बंद झाल्यावर विवेक सध्या काय करतो हा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.

सीआयडीमधील विवेक मशरु हा त्या काळी अनेक तरुणींचा क्रश झाला होता. त्यामुळे सध्या तो काय करतो हे पाहुयात.

विवेक मशरुने अक्कड बक्कड बम्बे बो या मालिकेतून त्याच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तो सीआयडीमध्ये झळकला.

विवेकने सीआयडीमध्ये ६ वर्ष काम केलं. त्यानंतर तो कलाविश्वातून गायब झाला.

विवेकने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. सध्या तो ब्लॉग लिहितो.

विवेक बंगळुरु येथे स्थायिक असून तेथे तो CMR यूनिव्हर्सिटीच्या DCCC (डिपार्टमेंट ऑफ कॉमन कोर करिकुलम) मध्ये प्रोफेसर आहे.

या आधी विवेकनं अनेक शाळा आणि इंस्टीट्यूशन्समध्ये काम केले आहे. असं म्हटलं जाते की इंडस व्हॅली स्कूलचा मार्केटिंग डायरेक्टर देखील होता.

















