Tejasswi Prakash : "आईने आम्हाला एकटीने वाढवलं, माझ्यासाठी तिच्या बांगड्या गहाण ठेवल्या"; तेजस्वी प्रकाश भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:32 IST2025-03-18T12:21:07+5:302025-03-18T12:32:50+5:30
Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाश खूप भावुक झालेली पाहायला मिळालं. तेजस्वीने तिच्या आयुष्यातील संघर्षांबद्दलही सांगितलं.

सेलिब्रिटी मास्टरशेफ आजकाल खूप चर्चेत आहे. या शोमध्ये निक्की तांबोळी, गौरव खन्ना, तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कर, फैजल शेख, अर्चना गौतम असे स्टार्स दिसत आहेत.
आता लवकरच शोमध्ये एक फॅमिली एपिसोड येणार आहे. या भागात स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना सपोर्ट करतील. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची आई शोमध्ये येणार आहे. याचदरम्यान, तेजस्वी प्रकाश खूप भावुक झालेली पाहायला मिळालं.
तेजस्वीने तिच्या आयुष्यातील संघर्षांबद्दलही सांगितलं. तेजस्वी म्हणाली की, "बाबा नेहमीच सौदीमध्ये येथे काम करायचे. आईने आम्हाला एकटीने वाढवलं."
"एका महिलेने एकटीने दोन मुलांना वाढवणं खूप कठीण असतं, विशेषतः जेव्हा त्यापैकी एक मुलगी असते. जेव्हा आम्ही वाईट काळातून जात होतो तेव्हा ती घरोघरी जाऊन पॉलिसी विकायची."
तेजस्वीची आई यावर म्हणाली -"पैसे नसतील तर आपण काय करायचं? काहीना काही तरी होईल. तेजस्वी नेहमीच माझा आधार राहिली आहे. मी कांदे विकले आहेत."
"मी माझ्या आईला सांगितलं होतं की मला गाडी हवी आहे. म्हणून माझ्या आईने तिच्या बांगड्या गहाण ठेवल्या आणि माझ्यासाठी एक सेकंड हँड गाडी आणली."
"जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी आईला विचारलं की बांगड्या कुठे गेल्या? पण तिने तिच्या बांगड्या माझ्यासाठी गहाण ठेवल्या होत्या. मी तिला त्या लगेच आणायला सांगितल्या."
"मला एका फॅशन शोसाठी ५ हजार रुपये मिळाले होते आणि ते पैसे मी माझ्या आईला दिले होते" असं देखील तेजस्वी प्रकाशने म्हटलं आहे.
तेजस्वी सध्या अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे. दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. त्यांच्या रिलेशनशिपची नेहमीच चर्चा होते.
अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.