रोमँटिक 'विंटर डायरीज'... कॅमेरासमोर करण कुंद्राने घेतला तेजस्वी प्रकाशचा Kiss!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 10:46 AM2023-01-16T10:46:09+5:302023-01-16T10:55:45+5:30

छोट्या पडद्यावरची बहुचर्चित जोडी म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा.

छोट्या पडद्यावरची बहुचर्चित जोडी म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा. बिग बॉस 15 मध्ये तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या जोडीला चाहत्यांनी खूपच लाइक केले. सीझन संपल्यानंतरही त्यांची जोडी अजूनही कायम आहे आणि त्यांच्या चाहत्यांना या दोघांनाही एकत्र पाहायला आवडते.

दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. या जोडीचा मोठा चाहता वर्ग आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

अलीकडेच, तेजस्वी प्रकाशने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबतचे काही फोटो शेअर केले आणि 'विंटर डायरीज' या कॅप्शनमध्ये लिहिले.

या फोटोंमध्ये, कपल एकत्र सेल्फी घेताना दिसत आहे आणि सर्व फोटोंमध्ये दोघांनी हिवाळ्यातील कपडे घातले आहेत. या फोटोंमध्ये तेजस्वी आणि करण गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसत आहेत.

दोघांनीही थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी क्युट हुडी परिधान केले आहेत. करण आणि तेजस्वी सध्या सुट्टीवर असून, थंडीचा आनंद घेण्यासाठी ते सध्या भटकंती करत आहेत.

या दरम्यानचे काही फोटो करण कुंद्रा याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघांचे क्युट फोटो पाहून चाहते देखील या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.