‘ही’ आहे ‘बिग बॉस ओटीटी’ची सर्वाधिक महागडी स्पर्धक, जाणून घ्या कोणी किती घेतलं मानधन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 17:55 IST2021-08-19T17:31:00+5:302021-08-19T17:55:21+5:30

Bigg Boss OTT :‘बिग बॉस’च्या घरात राहणं सोप्पं नाही म्हणतात. पण याचसाठी दाम मिळतात. सर्व कलाकार तगडे मानधन घेतात. ‘बिग बॉस ओटीटी’च्या स्पर्धकांच्या मानधनावर एक नजर...

‘बिग बॉस’च्या घरात राहणं सोप्पं नाही म्हणतात. पण याचसाठी दाम मिळतात... सर्व कलाकार तगडे मानधन घेतात.

शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील सर्वात चर्चित चेहरा आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मधील एका आठवड्यासाठी ती 3 लाख 75 हजार इतकं मानधन घेत असल्याचे कळतेय.

बहू हमारी रजनी कांत या मालिकेमुळे फेमस झालेली अभिनेत्री रिद्धिमा पंडित ही ‘बिग बॉस ओटीटी’ची सर्वात महागडी स्पर्धक आहे, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. एका आठवड्यासाठी ती 5 लाख रुपये मानधन घेत असल्याची चर्चा आहे.

गायिका नेहा भसीन ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात चांगलीच गाजतेय. एका आठवड्यासाठी ती 2 लाख रुपये इतके मानधन घेत असल्याची चर्चा आहे.

कुमकुम भाग्य या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेला जीशान खान एका आठवड्यासाठी 2 लाख 50 हजार इतके मानधन घेत असल्याचं कळतंय.

अनेक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात दिसलेली दिव्या अग्रवालला प्रत्येक आठवड्यासाठी 2 लाख रुपये मानधन दिल्याची चर्चा आहे.

अभिनेता राकेश बापट हा सुद्धा ‘बिग बॉस ओटीटी’ स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. एका आठवड्याचं त्याचं मानधन 1 लाख 20 हजार रूपये असल्याचं कळतंय.

भोजपुरी स्टार अक्षरा सिंह प्रत्येक आठवड्यासाठी 1 लाख 70 हजार रुपये मानधन घेत आहे.

अभिनेता करण नाथ याने एका आठवड्यासाठी 1 लाख 75 हजार रुपये इतके मानधन घेतले आहे.

पंजाबी गायक मिलिंद गाबा देखील बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. मिलिंद या शोसाठी एका आठवड्याला 1 लाख 75 हजार रुपये मानधन घेत असल्याचे कळतेय.

सोशल मीडियावरील सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जाणारी मुस्कान जट्टाना एका आठवड्यासाठी 1 लाख 75 हजार इतके मानधन घेत असल्याचे कळतेय.

प्रसिद्ध कोरिओग्राफर निशांत भट्ट याला या शोसाठी एका आठवड्याला 1 लाख 20 हजार इतके मानधन मिळतेय.

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रतिक सेहजपाल. हा प्रतिक एका आठवड्यासाठी 1 लाख रुपये मानधन घेत आहे.

पहिल्याच आठवड्यात घरातून बाद झालेली उर्फी जावेद हिला एका आठवड्यासाठी 2 लाख 75 हजार रुपये इतक्या मानधनावर साईन करण्यात आलं होतं असं कळतं.

Read in English