बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळनं केलं ट्रान्सपरेंट बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट, दिसली खूपच बोल्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 07:56 PM2022-09-10T19:56:49+5:302022-09-10T20:05:40+5:30

Heena Panchal : अभिनेत्री हिना पांचाळचे बोल्ड फोटो चर्चेत आले आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरातून अभिनेत्री हिना पांचाळ घराघरात पोहचली आहे.

बिग बॉसमुळे हिना लोकप्रिय झाली. या शो नंतर फारशी कोणत्याही मराठी कार्यक्रमांमध्ये झळकली नाही.

हिना पांचाळ बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

हिना पांचाळने नुकतेच इंस्टाग्रामवर ट्रान्सपरेंट बॉडीकॉनमधील फोटो शेअर केले आहेत.

हिनाने ट्रान्सपरेंट बॉडीकॉनमध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे.

हिना पांचाळच्या या फोटोंनी इंटरनेटवरील तापमान वाढवलं आहे.

सोशल मीडियावर हिना पांचाळचे बोल्ड फोटो पाहायला मिळतात.

हिना पांचाळने २०१४ साली तिचं फिल्मी करिअर सुरू केलं. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केले आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.

हिना सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते. बिग बॉस मराठी सीझन 2मध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवली होती.