Bigg boss marathi फेम अभिनेत्रीने लाँग शर्टमध्ये केलं बोल्ड फोटोशूट; अभिनेत्रीच्या हॉटनेसची होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 08:00 AM2022-07-09T08:00:00+5:302022-07-09T08:00:00+5:30

Heena panchal: हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यात 'हुक्का', 'मोहल्ला', 'बेबो बेबो', 'राजू ओ राजू', 'बोगन' या सिनेमांचा समावेश आहे.

Bigg boss marathi या शोचं प्रत्येक पर्व सोशल मीडियावर गाजलं. या शोमुळेच अनेक कलाकारही प्रकाशझोतात आले. त्यातलंच एक नाव म्हणजे हिना पांचाळ.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात हिना सहभागी झाली होती. या शोमध्ये हिना टास्क खेळण्यासोबतच तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळेही बऱ्याचदा चर्चेत आली.

या कार्यक्रमानंतर काही प्रोजेक्टमध्ये झळकलेली हिना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.

हिना अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते.

सध्या सोशल मीडियावर हिनाच्या काही बोल्ड फोटोंची चर्चा रंगली आहे. या फोटोमध्ये हिनाने लॉग शर्ट परिधान केला आहे.

या फोटोमुळे नेहा बरीच चर्चेत येत असून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

हिनाने लॉग शर्टमध्ये केलेल्या फोटोशूटची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे

हिनाने २०१४ साली सिनेकारकीर्दीला सुरूवात केली. परंतु, अभिनेत्रीऐवजी तिला आयटम गर्ल म्हणून जास्त लोकप्रियता मिळाली.