Bigg Boss Marathi: स्वत:ला सरकार म्हणवून घेणारी, तलवारीची धमकी देणारी दिव्या शिंदे नेमकी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:33 IST2026-02-07T13:33:54+5:302026-02-07T14:33:42+5:30
'बिग बॉस मराठी'च्या घरात शुक्रवारी हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने दिव्या शिंदेला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात शुक्रवारी हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने दिव्या शिंदेला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला.

तन्वीने दिव्याला नॉमिनेट केल्यामुळे तिचा पारा चढला आणि तिने थेट तलवार चालवण्याची धमकी दिली. बिग बॉसने दिव्याला तिची चूक मान्य करून ती सुधारण्याची संधीही दिली.

मात्र दिव्याने तिच्या म्हणण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. त्यामुळे सदस्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बिग बॉसने दंड म्हणून दिव्याला तातडीने घरातून बाहेर काढलं. त्यामुळे दिव्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

याआधी दिव्या सिंहगड कॉलेजमधील विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चेत आली होती. कॉलेज प्रशासनाने मेरीटमध्ये नाव असूनही आणि सर्व कागदपत्रे बरोबर असूनही प्रवेश नाकारल्याने दिव्याने आंदोलन केलं होतं.

दिव्याच्या या आंदोलनाची प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली होती. तिच्या विद्यार्थी आंदोलनाला यशही आलं होतं. बिग बॉस मराठीमध्येही दिव्याने याचा उल्लेख केला होता.

आंबेडकर विचारांची दिव्या एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. चळवळींमध्येही दिव्याचा सहभाग घेत असल्याचं दिसतं.

खासकरून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी दिव्या आंदोलनातून आवाज उठवते. भाषणातून ती तिचे विचार मांडते.

तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर तिचे १.१ मिलियन फॉलोवर्स आहेत.

सरकार सेना संघटना नावाची संघटना दिव्या चालवते. या संघटनेची ती अध्यक्ष आहे. रील्समधूनही दिव्या अनेकदा तिचे विचार मांडते. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनुसार चालत असल्याचं दिव्याचं म्हणणं आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लवकरच यावर भाष्य करणार असून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार असल्याचं म्हटलं.

















