पहिल्या बायकोला अजूनही विसरू शकला नाही राकेश बापट, बॉलिवूड अभिनेत्रीशी केलेलं लग्न, ८ वर्षांतच मोडला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 16:51 IST2026-01-19T16:46:45+5:302026-01-19T16:51:58+5:30

राकेश बापटने बॉलिवूड अभिनेत्री रिद्धी डोगरासोबत संसार थाटला होता. मात्र अवघ्या ८ वर्षांतच ते घटस्फोट घेत वेगळे झाले.

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वामुळे राकेश बापट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राकेशने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

राकेश बापटने अनेक हिंदी मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. करिअरबरोबरच तो त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे.

राकेश बापटने बॉलिवूड अभिनेत्री रिद्धी डोगरासोबत संसार थाटला होता. मात्र अवघ्या ८ वर्षांतच ते घटस्फोट घेत वेगळे झाले.

'बिग बॉस मराठी'च्या घरात राकेश त्याच्या एक्स पत्नीबद्दल बोलताना दिसला. करणला लग्नाचा सल्ला देताना राकेश म्हणाला की "मी माझ्या मैत्रिणीशी लग्न केलं होतं. मी काम करत असतानाच माझी जोडीदार मला भेटली. आम्ही एकाच शोमध्ये काम करत होतो".

"आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो आणि त्यानंतर मग लग्न करण्याचा निर्णय घेतला. वेगळे झाल्यानंतरही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत".

घटस्फोटानंतरही राकेश त्याच्या पहिल्या बायकोला विसरू शकलेला नाही. अद्याप दोघांनीही दुसरं लग्न केलेलं नाही.

'मर्यादा: लेकीन कब तक' या मालिकेच्या सेटवर राकेश आणि रिद्धी एकमेकांना भेटले होते.

२०११ मध्ये लग्न करत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. मात्र लग्नानंतर ८ वर्षांनी २०१९ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.